चक्क शेणावर सीएनजी गाड्या धावणार! सुझुकीने केला भारत सरकारच्या या एजन्सीसोबत करार
देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी ( Maruti Suzuki ) ची मूळ कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशन (Suzuki Motor Corporation) (SMC) ने कार्बन डायऑक्साइड (CO2) उत्सर्जनाचा सामना करण्याच्या उद्देशाने शेणापासून बायोगॅसचे उत्पादन करण्याची घोषणा केली आहे. ज्याचा वापर देशात सीएनजी कार चालवण्यासाठी केला जाऊ शकतो.

मारुती सध्या 14 CNG मॉडेल्सची विक्री करते,
मारुती सध्या 14 CNG मॉडेल्सची विक्री करते, ज्यात Alto, Alto K10, S-Presso, Celerio, Eeco, WagonR, Swift, Dzire, Ertiga, Baleno, XL6, Grand Vitara, Tour S आणि Super Carry यांचा समावेश आहे. भारतातील सीएनजी कार बाजारात कंपनीचा वाटा सुमारे 70 टक्के आहे.
शेणापासून बायोगॅस तयार केला जाईल
कंपनी म्हणाली, शेणापासून बायोगॅस तयार केला जाईल आणि त्याचा पुरवठा केला जाईल, जो डेअरी कचरा आहे, जो प्रामुख्याने भारताच्या ग्रामीण भागात दिसून येतो.” कंपनीने सांगितले की, हा बायोगॅस त्याच्या सीएनजी मॉडेलसाठी वापरला जाऊ शकतो.
SMC ने बायोगॅसच्या पडताळणीसाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, भारत सरकारची एजन्सी आणि बनास डेअरी, आशियातील सर्वात मोठी डेअरी उत्पादक यांच्यासोबत सामंजस्य करार (MoU) केला. कंपनीने फुजिसन असागिरी बायोमास एलएलसीमध्येही गुंतवणूक केली आहे, जी जपानमध्ये शेणापासून बनवलेल्या बायोगॅसचा वापर करून वीज निर्मिती करते.