एक विडिओ लाईकची किंमत १२ लाख २३ हजारांना पडली महागात

देशात बेरोजगार लोकांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे मिळेल ते काम करण्याच्या दिशेने तरुण पिढीचा पाऊल पुढे पडत आहे. परंतु काही जणांना काहीही काम न करता झटपट श्रीमंत व्हायचे असते. असे लोक शॉर्ट कट वापरायला जातात व आयुष्यभराची जमवलेली पुंजी गमवून बसतात. असाच प्रकार हिंजवडी येथे घडला. आजकाल सोशल मीडिया चा वापर प्रमाणापेक्षा जास्त व्हायला लागला आहे याचाच फायदा सायबर चोरटे घेऊ लागले आहेत.

youtubeliketaskfraud

एका व्हिडीओला लाईक केले म्हणून ५० रुपये मिळाले

एका व्हिडीओला लाईक केले म्हणून ५० रुपये मिळाले. हिंजवडीतील एका माणसाला काही रक्कम भरून विडिओ ला लाईक करण्याचे काम घेऊन तब्बल १६ वेळा असे रिफंड म्हणून ९ हजार रुपये मिळाले. त्यामुळे या टास्कमध्ये पैसे गुंतवले तर रकमेचा चांगला रिफंड आणि बोनसदेखील मिळेल, असे आश्वासन मिळाल्याने याने अवघ्या एका दिवसात तब्बल १२ लाख २३ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, या गुंतवणुकीनंतर संबंधित काम देण्याऱ्या व्यक्तीने टेलिग्राम ग्रुपच डिलिट करून गुंतवणूक केलेल्या पैशाचा परतावा न देता फसवणूक केली. हिंजवडी येथे ही घटना नुकतीच घडली.

सायबर फिशिंग अश्या प्रकारे होते

सायबर चोरटे एखाद्याला फसवण्यासाठी त्याच्या मोबाईलवर एखादा एसएमएस, व्हॉट्सॲप मेसेज, इ-मेल पाठवतात. ज्यामध्ये तुमचे खाते लवकरच बंद होणार आहे, केवायसी, वीज बिल अपडेट करा असा दावा केला जातो. तसेच पाठवण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. एकदा का तुम्ही त्या लिंकवर क्लिक केले की तुमचे बँक अकाऊंट रिकामे झालेच म्हणून समजा.

काय काळजी घ्यावी

पैसे देऊन काम मिळत नाही त्यामुळे कष्ट करून पैसे कमवायला शिका.
अनोळखी फोन नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळा.
सोशल मीडियावर कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका.
एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन किंवा SMS करणाऱ्याला बँक डिटेल्स देऊ नका.
कुठलेही अनोळखी ॲप डाऊनलोड करून पैशांचे व्यवहार करू नका.

आम्हाला फेसबुक, ट्विटर इंस्टाग्राम वर जरूर फॉलो करा.