Marathi Ukhane | 1300+ नवरदेव-नवरीसाठी मराठी उखाणे

नव्या-जुन्या पिढीला आवडतील अशा लग्न तसेच अन्य शुभकार्यांसाठीच्या आणि महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवण्यास सोप्या अशा मराठी उखाण्यांचा मजेशीर संग्रह एकदा तरी नक्की वाचा. आजच्या पिढीला नक्की आवडेल असा नवनवीन, मजेशीर, लग्न तसेच इतर खास दिवसांसाठीच्या Marathi Ukhane मराठी उखाण्यांचा बहारदार नजराणा.

Marathi Ukhane

अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका.

संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा,
…रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.

marathi ukhane

सासरची छाया, माहेरची माया,
…आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया.

जुईची वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा.

दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी,
…रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.

संसाराच्या सागरात प्रेमाची होडी,
…रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

marathi ukhane for male

नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद,
….राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात.

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही,
…रावांचे नाव हळूच ओठी येई.

मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध,
…सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद !

आतून मऊ पण बाहेर काटेरी साल,
…दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल.

ukhane marathi for female

नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा,
रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा.

आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा,
…रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.

आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम,
…सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम.

मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,
….च नाव घ्यायला मला नाही आळस्..

marathi ukhane for female

सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण,
… रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.

रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन,
…रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन.

लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास,
अन …. घशात अडकला घास.

चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा,
…रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा.

marathi ukhane for bride

शिंपल्यात सापडले माणिक मोती,
…रावांच्या जीवनात झाले मी सारथी.

बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,
….रावं बिड्या पितात संडासात बसून.

महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड्..
रावांना डोळे मारण्याची लई खोड्.

हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा काठ जरतारी,
… रावांचे नाव घेताच येई चेहऱ्यावर तरतरी.

ukhane marathi for male

दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची,
…च नाव घेते, सून मी….ची.

महादेवाला बेल, विष्णूला तुळस,
— रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस.

आंनदाने भरला दिन हा लग्नाचा,
— रावांना घास देते गोड जिलेबीचा.

सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
…रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी.

marathi ukhane for marriage

Marathi Ukhane for Male

सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण,
— रावांचे नाव घेते ऐका सारेजण.

मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस
— रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळस.

सासरचे निराजंन माहेरची फुलवात
— रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात.

आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी
— रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी.

gruhpravesh ukhane

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
— रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.

नव्या आयुष्याची नवी नवी गाणी
— च्या घराण्यात — रावांची झाले मी राणी.

नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर.

पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी…
…मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

haldi kunku ukhane

मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध…
….शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध.

माहेर जणू गंगा, सासर जणू सागर
त्यातच एकरुप — रावांचे सूख निर्झर.

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
— रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते.

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
—- रावाचं नाव ह्ळुच ओठी येई.

funny marathi ukhane

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
— रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी.

आकाशाच्या अंगणात ब्रम्हा,विष्णू आणि महेश
…रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश.

पायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती
— रावांच्या स्नेहाने गेली माझी भिती.

सत्य प्रुथ्वीचा आधार,सूर्य स्वर्गाचा आधार
यज्ञ देवतांचा आधार — राव माझे आधार.

marathi ukhane for groom

मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती
— रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती.

पित्याचे कर्तव्य संपले,कर्तव्याला माझ्या सुरूवात
— रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात.

गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद
— रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात.

सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी
— रावांचे नाव घेते — च्यावेळी.

satyanarayan ukhane marathi

संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा
— रावांचे नाव घेऊन,मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा.

स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी
— रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्यावेळी.

रुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा
—रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचा.

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी
—-रावांच्या जीवनात आहे मला गोडी.

marriage ukhane in marathi for male

सर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात
—रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.

Marathi Ukhane for Female

भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
—रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची.

जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले
—रावांच्या नावाकरीता एवढे का अडविले.

शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान
— रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान.

ukhane for male

आत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण
— रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण.

कुलीन घराण्यात जन्मले,कुलवान घराण्यात पडले
—रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले.

नाही मोठेपणाची अपेक्षा,नाही दौलतीची इच्छा
…रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा.

माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन
—रावांच्या संसारात मन घेते वळून.

long ukhane in marathi for female marriage

लग्नाचे बंधन,जन्माच्या गाठी
—रावांचे नाव घेते तुमच्यासाठी.

संसाररुपी कादंबरीचे उघडले पहिले पान
—रावांचे नाव घेऊन तुमचा करीते मान.

लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विद्या शोभते विनयाने
—रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाने.

संसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर
आयुष्याचा प्रवास करते — रावांबरोबर.

मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार
— रावांच्या रुपाने झाला साक्षात्कार.

घराला असावं अंगण,अंगणात डोलावी तूळस
—रावांच्या जीवनात चढवीन आंनदाचा कळस.

सूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले
—रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले.

अंलकारात अंलकार मंगळसूत्र मूख्य
—रावांचा आनंद हेच माझे सौख्य.

मंगळ्सूत्र हा सौभाग्याचा अंलकार
—रावांच्यासह ध्येय, आशा होवोत साकार.

आकाशाच्या पोटी चंद्र, सूर्य,तारांगणे
—रावांचे नाव घेते तूमच्या म्हणण्याप्रमाणे.

नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा
—रावांचे नाव असते ओठांवर,पण प्रश्न असतो उखाण्याचा.

संसार सागरात प्रीतीच्या लाटा
—रावांच्या सुखदु:खात उचलीन मी अर्धा वाटा.

सुखी संसारात हवी विश्वासाची जोड
—रावांचे नाव घेते, घास घालून तोंड करते गोड.

आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस
—राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस.

सीतेची पतिभक्ती,सावित्रीचा निग्रह
—रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रह.

लाल चूटूक मेंदी, हिरवागार चुडा
—रावांसाठी जीव झाला माझा वेडा.

आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर
आयुष्याचा प्रवास करीन—-रावांच्या बरोबर.

आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा
—राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा.

सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी
—राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी.

मनोभावे प्रार्थना करुन पुजला गौरीहर
—रावांचा सहवास लाभो जन्मभर.

मराठी उखाणे

प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी
जीवनाचे पूष्प वाहिले—रावांच्या चरणी.

चांदीच्या ताटात पक्वानांची रास
—रावांना देते लाडूचा घास.

रंगबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते
लाडूचा गोड घास—रावांना देते.

मंगळागौरीची पूजा मनोभावे करते
—रावांसाठी दीर्घायुष्य मागते.

चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल
—रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल.

navardevache ukhane

अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली
—रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली.

नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर
—रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर.

शब्द तिथे नाद कवी तिथे कविता
—रावांची जोड जणू सागर आणि सरिता.

नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पर्दापण
—रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण.

चंदनाच्या झाडावर बसला मोर
—रावांच्या जीवावर मी आहे थोर.

उंबरठयावरचं माप पायांनी लोटते
—रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते.

आई, बाबा येते आशीर्वाद दयावा
—रावांचा सहवास जन्मभर लाभावा.

—रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन
आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन.

मोत्याची माळ,सोन्याचा साज
—रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज.

मंगळागौरी माते नमन करते तुला
—रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला.

दिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंक्ती
—रावांना ओवाळते मंगल आरती.

नीलवर्ण आकाशात चमकतात तारे
—रावांचे नाव घेते लक्ष दया सारे.

सांयकाळ्चे वेळी नमस्कार करते देवाला
—रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला.

इग्रंजी भाषेत चंद्राला म्हणतात मून
—रावांचे नाव घेते —ची सून.

खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड
—रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोड.

थोर कुळांत जन्मले,सुसंस्कारात वाढले
—रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले.

सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा
—रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटा.

मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा
—रावांच्या संसारात लावीन दिप नवा.

संसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल
—रावांना लागली बाळाची चाहूल.

फुलांच्या सोडल्या माळा,जागोजागी लावले आरसे
—रावांच्या बाळाचे आज आहे बारसे.

गुलाबांचा ताटवा,लतांचा कुंज
—रावांच्या बाळाची आज आहे मौंज.

गोकुळात आला क्रुष्ण,सर्वांना झाला हर्ष
—रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष.

इग्रंजी भाषेत आईला म्हणतात मदर
—रावांचे नाव घेते सोडा माझा पदर.

फुलात फुल जाईचे फुल
—रावांनी घातली मला भूल.

Ukhane Marathi for Female

सोन्याची घुंगरं,चांदीच्या वाळ्या
सोनार घडवी दागिने—रावांच्या बाळाला.

वरातीच्या मिरवणूकीत सनईचे करुण सूर
—रावांच्या बरोबर जातांना मनात होते हूरहूर.

दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र
—रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र.

अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा
—रावांच्या नावावर भरते लग्नचुडा.

आला श्रावणमास,पाऊस पडला शेतात
—रावांचे नाव घेते धनधान्यसंपन्न घरात.

शरदाचे चांदणे, मधुवनी फुले निशी़गंध
—रावांचे नाव घेण्यात मला आहे आनंद.

navriche ukhane

जीवनात ही घडी अशीच राहू दे
—रावांचे प्रीतफुल असेच हसु दे.

संथ वाहती गंगा,यमुना,आणि सरस्वती
—रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महती.

कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात
—रावांचे नाव घेते माझ्या मनात.

श्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान
—रावांचे नाव घेते,राखते सर्वांचा मान.

साता जन्मीची पूण्याई फळाला आली आज
—रावांच्या हाताने ल्याले मंगळ्सुत्राचा साज.

पत्रिका जुळ्ल्य़ा योग आला जूळून
—राव पती मिळावे म्हणून नवस केला कुलदेवतेला स्मरुन.

चंद्राचा उदय, समुद्राला भरती
—रावांच्या शब्दांनी सारे श्रम हरती.

सूख समाधान तिथे लक्ष्मीचा वास
—रावांना देते मी जिलेबीचा घास.

निळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे
लग्नाच्या दिवशी — स वाटे –रावांचे नाव घ्यावे.

नागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला
—रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला.

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
….आहेत आमचे फार नाजुक.

लग्नात्त लागतात हार आणी तुरे
…. च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे.

पदस्पर्शाने लंवडते उंबरठ्यावरलं माप
—रावांची भाग्यलक्ष्मी म्हणुन ग्रुहप्रवेश करते आज.

नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.. च नाव आहे लाख रुपये तोळा.

आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
..ला भरविते जिलेबिचा घास.

आकाशात उडतोय पक्षांचा थवा
..चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध,
.. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.

चांदीच्या ताटात फणसाचे गरे..
राव दिसतात बरे पण वागतील तेव्हा खरे.

सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन,
….रावाचे नाव घेते …ची सुन.

मंगळसुत्राचे २ डोरले,एक सासर अन दुसरे माहेर,
—रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

Ukhane Marathi for Male

काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत
—राव गेले ऑफिसला मला नाही करमत.

केळीचपान पान चुरुचुरु फाटत..
..रावाच नाव घेताना लई भारी वाटत.

एक होति परि …..
नाव घेते आता जावा आपापल्या घरी.

तुमच्यापावलांवर पाउल ठेवून मी सप्तपदी चालले
आणि….नाथा मी तुज़ीच जाहले.

संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव—ची जोडी.

रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित
मागते आयु्ष्य—च्या सहीत.

गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
—-नाव घेते सोडा माझी वाट.

भाग्याचे कुंकू प्रेमाचा आहेर
रावांच्या मिठित विसरते मी माहेर.

नेत्ररुपी निरंजनात प्रेमरुपी फुलवात
— चे नाव घेण्यास आजच केली सुरवात.

आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद
—चे नाव घेते तुम्हा सर्वाचा आशिर्वाद.

lagnache ukhane

दौलत होति तुळस माहेरच्या अंगणात ..
साथि फुलेल आता सासरच्या व्रुन्दवनात्.

नांदा सौख्य भरे दिला सगळ्यांनी आशीर्वाद
…चे नाव घेते द्या सत्यनारायनाचा प्रसाद्.

श्रावणात पडतात सरीवर सरी
—रावांचं नाव घेताना मी होते बावरी.

ग़ूलाबाचे फुल दिसायला ताजे
—नाव घेते सौभाग्य माझे.

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि
रावांचे नाव घेते–च्या लग्नाच्या दिवशी.

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा..
लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा..!

..रावांची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
….रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !

उंच उंच डोंगर हिरवे.. त्याला टेकतं आभाळ..
.. रावांचं काय नाव घेऊ…. कपाळ?

पावाबरोबर खाल्ले अमूल बटर..
..चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर.

एक होती चिऊ एक होती काऊ..
..रावांच नाव घेते ,डोक नका खाऊ..

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
..चे नाव घेते राखते तुमचा मान.

पाव शेर रवा पाव शेर खवा
….चे नाव घेते हजार रुपये ठेवा.

अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस
….चं नाव घ्यायचा मला नाही आळस.

ईवले ईवले हरीण,त्याचे ईवले ईवले पाय,
.. राव आले नाहीत अजुन,पिउन पडले की काय..!

Modern Marathi Ukhane for Female

चांदीच्या ताटात ठेवले होते गहू
लग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ.

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ.

चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे
घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे.

बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या
गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या.

सासऱ्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले,जावई राहीला उपाशी.

अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वांग्याची फोड
..हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्.

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
..आहेत आमचे फार नाजुक.

जीवन आहे एक अनमोल ठेवा,
..आणतात नेहमी सुकामेवा.

सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
..ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.

मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,
..हयांचं नाव घेते,घास भरवते नंतर.

लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास.

कर्दळीच्या वनात चंडोल पक्षी लपला
..शी लग्न करून..जन्माचा धुपला.

कौरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे
श्रीकृष्ण झाले सारथी, … आहेत फार निस्वार्थी.

भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
..च्या जीवावर करते मी मजा.

वन, टु, थ्री
..चं नाव घेते मला करा फ़्री.

इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाचे कव्हर,
..चे नाव घेते ..ची लव्हर.

कंप्युटरला असते हार्ड डिस्क,
हिच्याशी लग्न करून मी घेतलिय मोठी रिस्क.

रेशमी सदर्यासला प्लास्टीकचे बक्कल,
गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल.

समुद्रच्या काठावर मऊ मऊ वाळू,
…. दिसतात साधे, पण आतून एकदम चालू.

समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू,
….राव दिसतात साधे पण आतून चालू.

मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस,
__तू फक्त, मस्त गोड हास.

हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे,
__मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.

माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप…
__ ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.

__माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल…
तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल.

च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
ला पाहून, पडली माझी विकेट !

लाडाने जवळ गेले, केली जरा घसट
…. एकदम खेकसले, फ़ारच बाई तिरसट !

Navriche Ukhane

बदामाचा केला हलवा त्यात काजू टाकले किसुन.
..राव बिड्या पितात संडासात बसून.

श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
..ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.

बारिक मणी घरभर पसरले,
…. साठि माहेर विसरले.

हंसराज पंक्षी दिसतात हौशी,
….रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी.

चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.

प्रेमाच्या चौकात किती पण फिरा …
शोधून नाही सापडणार_सारखा हिरा.

एका वर्षात, महिने असतात बारा…
__मुळे वाढलाय, आनंद सारा!

ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा
__मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.

गोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ काळा काळा…
__च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.

लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त …
__आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त !

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
…. ला देतो मी श्रीखंडाचा घास.

ग़जाननाच्या मंदिरात संगीताची गोडी
सुखी ठेवा गजानना….आणि माझी हि जोडी.

गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे
…. चे नाव माझ्या ओठी यावे.

गाडीत गाडी डेक्कन क्वीन
…. आहे माझी ब्युटी क्वीन.

आकाशात उडतोय पक्षांचा थवा
….चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

एक होती चिऊ आणि एक होता काऊ …
__ च नाव घेतो, डोकं नका खाऊ.

निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे …
__ च नाव घेतो, लक्ष द्या सारे.

आकाशाच्या पोटात चंद्र, सूर्य, तारांगणे …
__ च नाव घेतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे.

धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
….च्या जीवावर करते मी मजा.

आई-वडील,भाऊ बहीण,जणू गोकुळासारखे घर
…. च्या आगमनाने पडली त्यात भर.

आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते गुंजन
सौ ….सोबत करतो मी सत्यनारायण पुजन !

उगवला रवी, मावळली रजनी,
…. चे नाव सदैव वसे माझ्या मनी.

उभा होतो मळयात, नजर गेली खळयात,
नवरत्नांचा हार …. च्या गळयात.

उमाचा महादेव आणि सितेचा राम,
…. आली जीवनी आता आयुष्यभर आराम.

कळी हसेल फूल उमलेल,मोहरून येईल सुगंध,
…. च्या सोबतीत,गवसेल जीवनाचा आनंद.

Navardevache Ukhane

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा …
__ च नाव घ्यायला उखाणा कशाला हवा!

प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल…
__च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.

अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश,
सौ….चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !

काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात
प्रथम दर्शनीच भरली….माझ्या मनात.

गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
सौ …. ने दिला मला प्रेमाचा हात !

चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ….चा आणि माझा जन्मोजन्माचा जोडा !

चंद्र आहे चांदणीच्या संगती
आणि …..आहे माझी जीवनसाथी.

चंद्राला पाहून भरती येते सागराला
….ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला.

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
….च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.

अग़ अग़ ….खिडकी वर आला बघ काउ,
घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.

अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,
…. ला घास घालतो वरण-भात तूपाचा.

आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड
…. चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड.

जाईच्या वेलीला आलाय बहार,
….ला घालतो २७ मे ला हार.

जाईजुईचा वेल पसरला दाट
….बरोबर बांधली जिवनाची गाठ.

जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध
….च्या सहवासात झालो मी धुंद.

जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
सुखी संसारात सौ….चा अर्धा वाटा !

जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,
….नी दिली मला दोन गोड मुले.

झुळझुळ वाहे वारा, मंद चाले होडी,
आयुष्यभर सोबत राहो ….-…. ची जोडी.

तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
….ना आवडते गावठी गुलाबाचे फुल.

ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
….चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ….च्या संग!

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून
….चं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून.

कृष्णा च्या बासरीचा राधेला लागे ध्यास
….. ला देतो मी लाडवाचा घास.

दासांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा
….चे नाव घेतो तुमचा मान मोठा !

Marathi Ukhane for Bride

दुधाचे केले दहि,दह्याचे केले ताक,ताकाचा केला मठ्ठा,
….चे नाव घेतो…रावांचा पठ्ठा.

दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ….सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला!

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
….चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.

देवळाला खरी शोभा कळसा ने येते
….मुळे माझे गृहसौख्य दुणावते.

देवा जवळ करतो मी दत्ताची आरती
….माझ्या जीवनाची सारथी.

देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ….ने दिला मला पतिराजांचा मान!

देवाला भक्त करतो मनोभावे वंदन
….मुळे झाले संसाराचे नंदन.

दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
….चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.

सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे,
….सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ….ची अखंड राहो प्रीती!

नंदनवनात अमृताचे कलश
….आहे माझी खूप सालस.

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
….झाली आज माझी गृहमंत्री!

निळे पाणी,निळे डोंगर,हिरवे हिरवे रान
….चे नाव घेऊन राखतो तुमच्या सर्वांचा मान.

निसर्गावर करू पाहत आहे आजचा मानव मात,
अर्धांगिनी म्हणून….ने दिला माझ्या हातात हात.

नीलवर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी,
….चे नाव घेतो…च्या घरी.

पाणीपुरी खाताना लागतो जोरदार ठसका,
….ला आवडते बिस्किट ब्रिटानिया मस्का-चस्का.

पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
….ची व माझी जडली प्रिती.

पाटावर बसून ताटात तांदूळ पसरले,
त्यावर सोन्याच्या अगंठीने….चे नाव लिहिले.

लग्नात लागतात हार आणी तुरे,
….च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

वड्यात वडा बटाटावडा,
….ला मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.

प्रसन्न वदनाने आले रविराज,
….ने चालविला संसारात स्नेहाचा साज.

फुलासंगे मातीस सुवास लागे,
….नि माझे जन्मोजन्मिचे धागे.

बंगलौर, म्हैसूर ,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास भरवतो …. बोट नको चाउ.

बकूळीच्या फुलांचा सडा पडे अंगणी,
सौ….आहे माझी अर्धांगिनी!

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
….ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

पुढे जाते वासरू, मागून येते गाय,
….ला आवडते नेहमी दुधावारची साय.

बहरली फुलांनी निशिगंधाची पाती,
…. चे नाव घेतो लग्नाच्या राती.

Comedy Ukhane

भाजीत भाजी पालक,
…. माझी मालकिन अन् मी मालक!

मनी असे ते स्वप्नी दिसे ओठी आणू मी हे कसे,
….माझी नववधू, शब्दात मी हे सांगू कसे.

मातीच्या चुली घालतात घरोघरी,
….झालीस तू माझी, आता चल माझ्या बरोबरी.

….बिल्डींग,तिसरा मजला,घर न – ११,घराला लावली घंटी,
….माझी बबली आणि मी तिचा बंटी.

मुंबापुरची मुंबादेवी आज मला पावली,
श्रीखंडाचा घास देताना….मला चावली.

मुखी असावे प्रेम, हातामधे दया,
….सोबत जोडली माझी माया.

मोठ्यांसमोर सर्वच गोष्टींत मी झालो पास,
….ला देतो गुलाबजामचा घास.

मायामय नगरी, प्रेममय संसार
….च्या जिवावर माझ्या जीवनाचा भार.

मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा
….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

मोहमाया – स्नेहाची जाळी पसरली घनदाट
….बरोबर बांधली नवीन जीवनाची गाठ.

रखरखत्या वैशाखात प्रेमाचा घुंद वारा
जीवनाचा खेळ समजला….मुळे सारा.

रुप्याचा लोटा सोन्याची झारी
असली काळी सावळी तरीही….माझी प्यारी.

रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे
….ला पाहून सूर्य चंद्र हसे.

रोज सकाळी उठुन पितो मी भरपुर पाणी,
….चे नाव घेता येते डोळ्यात पाणी.

साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरांचा मसाला
….नाव घ्यायला आग्रह कशाला.

वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
सौ….सोबत सुरु केला नवीन जीवनाचा प्रवास!

शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
….च्या प्राप्तीने माझे भाग्य उदयाला आले.

शेतात नांगरता नांगरता सापडली कवडी
……माझ्या गुडघ्या एवढी.

श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण
….ला सुखात ठेवी हा माझा पण.

श्री गणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून
….माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून.

संतांचे वाङमय म्हणजे सारस्वताचा सागर
…. म्हणजे प्रेमाचा आगर.

संसाररूपी सागरात पती पत्नीची नौका
….चे नाव घेतो सर्व जण ऐका.

संसाराच्या सागरात पतीपत्नी नावाडी
….मुळे लागली मला संसाराची गोडी.

सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात
….चे नाव घेतो….च्या घरात.

सायंकळीच्या आकाशाचा निळसर रंग
आणि …. असते घरकमात दंग.

वर्षाचे महिने बारा,
….या नावात सामवलाय आनंद सारा.

सासूबाई आहेत प्रेमळ,मेहुणी आहे हौशी
सौ….चे नाव घेताना मला होते ख़ुशी!

Funny Marathi Ukhane

सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप
….आहे मला अनुरूप.

सिद्धिविनायकाच्या देवळाला सोन्याचा कळस
….चे नाव घ्यायला मला नाही आळस.

सुराविना कळला साज संगीताचा,
…. नावात गवसला अर्थ जीवनाचा.

सोन्याची सुपली, मोत्यांनी गुंफली
….राणी माझी घरकमात गुंतली.

संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता
साथ आहे माझ्याबरोबर….सारखी सूर्यकांता!

संस्कृत काव्यात श्रेष्ट आहे जयदेवाच गीतगोविंद,
….च्या नावाचा लागलाय मला छंद.

स्वतंत्र भारताची तिरंगा ध्वजाने वाढवली शान
….चे नाव घेतो ठेवून सर्वांचा मान.

हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
सौ….चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी!

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी
….च्या जीवनात मला आहे गोडी.

हिरवळीवर चरते सुवर्ण हारिणी
….झाली आता माझी सहचारिणी.

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
….चे नाव घेतो सर्वजण ऐका!

दोन शिंपले एक मोती,दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ….ची अखंड राहो प्रीती!

इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ….चे नाव घेण्यास लागते डबल फी!

यंदा घातलाय आमच्या_च्या लग्नाचा घाट,
उपस्थित राहून सर्वांनी, वाढवा शुभकार्याचा थाट.

_ आणि _ ची जमली आता जोडी…
लग्नाला येऊन सर्वांनी, वाढवा दिवसाची या गोडी.

आग्रहाचे निमंत्रण करतो, बघण्या फेरे सात…
…आणि… वर असू द्या, आशीर्वादाचा हात.

लग्नामुळे जुळतात, सासर आणि माहेर…
तुमचा प्रेमळ आशीर्वाद, हाच आमचा आहेर.

तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी,
नक्की या जुळताना, _ आणि ..च्या रेशीमगाठी.

नवे घर, नवे लोक, नवी नवी नाती…
संसार होईल मस्त, __राव असता सोबती.

नव्या नव्या संसाराचा, नाजूक-गोड अनुभवही नवा….
__राव व माझ्या संसाराला, तुमचा अखंड आशीर्वाद हवा.

नव्या नव्या घरात, कोणीही जाईल गांगरून….
__चुकली कुठे तर, घ्या जरा सावरून.

माझ्या गुणी __ला, पहा सगळ्यांनी निरखून….
जणू कोहिनूर हिरा, आणलाय आम्ही पारखून.

सुखी संसाराची करतोय, आम्ही आता सुरुवात
__ वर ठेवा कायम, तुमचा प्रेमळ मायेचा हात.

आमच्या दोघांचे स्वभाव, आहेत Complementary
__चे नाव घेऊन करते, घरात पटकन Entry.

उंबरठ्यावरती माप देते, सुखी संसाराची चाहूल
__च्या जीवनात टाकले मी, आज पहिले पाऊल.

Marathi Ukhane for Marriage

लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल
च नाव घेते, वाजवून च्या घराची बेल.

जमले आहेत सगळे,….च्या दारात
….रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात..

सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी,
….चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी..

रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
….रावानच नाव घेते सोडा माझी वाट.

हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात
….बसले दारात मी जाऊ कशी घरात.

जरतारी पैठणीवर शोभे,कोल्हापुरी साज
….च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज.

नवीन घरामध्ये, मन गेलं गांगरून
__रावांच्या मायेची, शाल घेते पांघरून.

लाल लाल मेहेंदी, हिरवागार चुडा
__ रावांमुळे पडला जीवनात, प्रेमाचा सडा.

सासरचे निराजंन, माहेरची फुलवात
__रावांचे नाव घेण्यास, करते मी सुरुवात.

संसाररुपी पुस्तकाचे, उघडले पहिले पान
__रावांच नाव घेते सर्वांचा राखून मान.

नव्या नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,
__माझा राजा आणि मी त्याची राणी.

हिरव्या हिरव्या जंगलात, झाडी घनदाट,
__रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.

खमंग चिवड्यात घालतात, खोबऱ्याचे काप,
__रावांच नाव घेऊन, ओलांडते मी माप.

लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल,
…. च नाव घेते, वाजवून…च्या घराची बेल.

नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात,
….रावांचे नाव घेते,..च्या दारात.

नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले
….रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले.

हिरव्या शालुला जरिचे काठ
….चे नाव घेते, सोडा माझी वाट.

गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
….नाव घेते सोडा माझी वाट.

जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज
__च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज.

माहेरी साठवले, मायेचे मोती…
__च नाव घेऊन, जोडते नवी नाती.

ची लेक झाली, ची सून…
__ च नाव घेते, गृहप्रवेश करून !.

सुखी ठेवोत सर्वांना, ब्रम्हा, विष्णू आणि महेश
__ रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश.

सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात…
__रावांचे नाव घेते, पण सोडा माझी वाट.

गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,
….च्या हातात हात देउन झाले मी निर्भर.

मराठी उखाणे नवरी साठी

गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
….नाव घेते सोडा माझी वाट.

चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप
….रावां समवेत ओलांडते माप.

माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले,
म्हणून….रावांची मी सौभाग्यवाती झाले.

उंबरठयावरचं माप पायांनी लोटते
…..रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते.

प्रेमाला नसते मोजमाप, नसते लांबी रुंदी
आज भरवते…ला, गोड गोड बासुंदी.

घरात दरवळला … चा सुवास
… ला भरवते,…चा घास.

रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास,
….ला भरवितो लाडूचा घास.

सुख-समाधान असेल, तिथे लक्ष्मीचा वास
…रावांना देते मी…चा घास.

दत्ताच्या देवळात सुगंधाचा वास,
….ला भरवतो लाडूचा घास.

गाण्यांच्या भेंड्यांचा मूड आहे खास,
….रावांना भरविते जलेबी/लाडूचा घास.

पंगतीत दरवळतो उदबत्तीचा सुवास,
….रावांना भरवते मी …चा घास.

दवबिंदूत होतो सप्तरंगांचा भास,
…. रावांना भरविते मी …. चा घास.

भरल्या पंक्तीत उदबत्तीचा वास,
…रावांना भरविते जलेबीचा घास.

जाई – जुईच्या फुलांचा मधुर सुटतो वास,
….रावांना देते मी ….चा घास.

मौजमजेने भरला, दिन हा…चा…
…रावांना घास देते, गोड गोड …चा.

मुंबई ते पुणे, ३ तासांचं आहे अंतर
आधी खाऊन घेतो जरा, नावाचं बघू नंतर.

सुंदर रांगोळ्यांनी आणली, पंगतीला शोभा
__ला भरवतोय घास, सर्वांनी बघा.

छोट्या टेकडीवर बांधले, मोठे फार्म हाऊस
घास भरवतो _, बोटं नको चावूस.

भाद्रपद महिन्यात गणपती बसवितात शाडूचा,
…. ला घास भरविते लाडूचा.

कृष्ण कन्हैयाला लागला राधेचा ध्यास,
…. रावांना भरविते मी….चा घास.

भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची,
… रावांना घास देते, पंगत बसली मित्रांची.

अभिमान नाही संपतीचा, गर्व नाही रूपाचा,
….रावांना घास भरविते वरण, भात, तुपाचा.

संसाराच्या गणिताचे, सुरु झाले पाढे,
__च नाव घेऊन, भरवते मी पेढे !.

च्या दिवशी फुलांची आरास…
रावांना भरवते, __ चा घास.

अंबाबाईच्या देवळात बिरवली आरसा,
….रावांना खाऊ खालते अनारसा.

कृष्णाच्या बारीला राधेचा ध्यास,
….रावांना भरविते मी …. घास.

Gruhpravesh Ukhane

सुख, समाधान तेथे लक्ष्मीचा वास,
…. रावांना भरविते मी ….चा घास.

महादेवाच्या मंदिरात नदीचा वास,
….रावांना भरविते मी….चा घास.

सर्वांनी आग्रह केला खास,
म्हणून….रावांना भरविते….चा घास.

सर्वांच्या आग्रहाखातर भरविते पुरी- श्रीखंड,
….रावांच्या साठी मी सोडून चालले आशियाखंड .

लग्नासारख्या मंगलदिनी कोणी नका रागावू आणि रुसू,
….रावांना घास भरवताना येते मला गोड हसू

भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली मोरांची,
….रावांना घास देते पंगत बसली थोरांची.

…पुढे लावली, समईची जोडी
… मुळे आली, आयुष्याला गोडी.

हा दिवस आहे आमच्या करिता खास,
….ला देतो गुलाब जामुन चा घास..

च्या पुढे, फुलांचे सडे
…रावांचे नाव घ्यायला, मी नेहमी पुढे!.

….च्या समोर, ठेवले केशरी पेढे
…रावांचे नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे ?.

….पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी
….रावांचे नाव घेते, … च्या दिवशी.

….पुढे मांडले, प्रसादाचे ताट
….मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट.

सासरची मंडळी, आहेत खूपच हौशी
….रावांचे नाव घेते, ….च्या दिवशी.

मोत्यांची माळ, सोन्याचा साज
….रावांचे नाव घेते, ….आहे आज.

आला आला ….चा, सण हा मोठा
….राव असताना, नाही आनंदाला तोटा.

….समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी
….रावांचे नाव घेते, ….च्या दिवशी.

….ची पूजा, मनोभावे करते…
….रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.

….मुळे झाली माझी सेकंड इनिंग सुरु
हसत खेळत आम्ही आता ….टूर करू.

आजोबा झालो तरी, मी अजूनही हिरो दिसतो
तुमच्या आजीकडे प्रेमाने, एक टक बघत बसतो.

बघता बघता ….सोबत ….वर्षे लोटली
रोज बघतो स्वप्नात, सकाळी ….भेटली.

केस झाले पांढरे, तरी मिशी अजून काळी
माझ्या संसारवेलीचे ….राव माळी.

हसत खेळत संसाराची, वर्षे सहज लोटणार…
….सोबत मी वयाची, शंभरी गाठणार.

म्हातारपणी काठी बनली, माझी साथीदार…
….मुळे मिळाला माझ्या, जीवनाला आधार.

औषधं आपली सुरूच असतात, दिवाळी असो वा होळी
…रावांना भरवते प्रेमाने, …ची गोळी.

…च्या गोळ्या घेऊन, तोंड होते कडू…
…इतकी गोड जणू, मऊ बेसनाचा लाडू.

Lagnache Ukhane

वय झालं, टक्कल पडलं, पोटही सुटलं …
…वरचं प्रेम, तरी अजिबात नाही आटलं.

उखाणे घेता घेता, सरली …वर्ष …
…रावांना भेटल्याचा, मनी खूपच हर्ष !

बघता बघता संसाराची…. वर्ष सरली…
….च्या साथीने माझी, आनंदवेल बहरली.

वयामुळे थकले अंग , तरीही मन ताजे…
…माझी राणी आणि आम्ही तिचे राजे.

माझ्या सुंदर हास्यामागे …चाच हात
…चा लाडू खाता खाता, तुटला की हो दात.

नाते जुने झाले तरी, रंग अजूनही ताजाच आहे…
….सोबत असताना, प्रत्येक दिवस मजाच आहे.

प्रेमाच्या टॉनिकने होई, तब्येत लगेच बरी …
….मुळे कळली मला, जगण्याची जिद्द खरी.

ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
….तू मला, सुपरवूमन वाटतेस.

पोळीचे नकाशे बनवणं, ही ….ची कला,
त्यानेही बनवल्या गोल तर, भाव कोण देणार मला?

…च्या बाईक वर … दिसतो एकदम फिट,
बोलू दे लोकांना, आपण आपले जाऊ डबल सीट.

मंथ एन्ड आला की, Work Load ने जीव होतो हैराण
…सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण.

बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून
….शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून.

यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली
….आल्यापासून सॅलरी कधी नाही पुरली.

लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा
तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?.

कधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त
….च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त.

उडालाय जणू काही, आयुष्यातील रंग
….माझी नेहमी, Whatsapp मध्ये दंग.

मिळून काम केल्यावर कामं होतात लवकर…
मी चिरते भाजी आणि ….लावतो कुकर.

दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते…
….च्या एका स्माईल ने दिवसभराचे टेन्शन पळते.

मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय…
….भाव देत नाही, कित्ती केले ट्राय.

नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट…
चल …..पिक्चरला, सीट पकडू लास्ट.

Haldi Kunku Ukhane

चांदीच्या ताटात …चे पेढे…
…माझे हुशार, बाकी सगळे वेडे!.

चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी
……माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी.

शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा…
….माझी म्हैस आणि मी तिचा रेडा.

बाजारातून घेऊन येतो ….ताजी ताजी भाजी
….शी गुलूगुलू करायला, मी नेहमीच राजी.

हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू …
….एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू.

साखरेचे पोते सुई ने उसवले,
….ने मला पावडर लाऊन फसवले.

हळद असते पिवळी, कुंकु असते लाल
….रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल.

परातीत परात चांदीचा परात,
….राव हागले दारात, जाऊ कशी घरात.

प्रसन्न वदनाने आले रविराज
….ने चालविला संसारात स्नेहचा सांज.

तांदुळ निवडत बसले होते दारात
ते पादले दारात आणि वास आला घरात.

कपात दुध दुधावर साय
…. च नाव घेते …. ची माय.

गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू…
….चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू..

….ची बाटली आणि काचेचे ग्लास …
….सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास.

लिपस्टिक वाढवते ….ची ब्यूटी…
त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी.

माझ्या …. चा चेहरा आहे खूपच हसरा …
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे क्षणामध्ये विसरा.

तिची नि माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफूल…
….माझी आहे खरंच कित्ती ब्युटीफुल!.

इस्त्री केल्यावर कॉलर राहते एकदम ताठ…
माझ्या….चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ.

गुलाबाचे फूल वाऱ्यावर लागते डुलू…
दिवसभर सुरु असते …. चे गुलूगुलू.

गरम गरम भाजीबरोबर, नरम नरम पाव…
….राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव!.

काचेच्या ग्लासात कोकम सरबत
….रावां शिवाय मला नाही करमत.

Acer च्या लॅपटॉपला Dell ची बॅटरी
…. ला लागली ५०००० ची लॉटरी.

होळी रे होळी …. पुरणाची पोळी
…. च्या पोटात बंदुकीची गोळी.

हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर
….रावांची लग्न केले कारण आली लहर केला कहर .

Marathi Ukhane for Groom

ईन मीन साडे तीन, ईन मीन साडे तीन,
….माझा राजा आणि मी झाले त्याची QUEEN!.

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
….माझी बायको आहे मोठी लुच्ची.

नागाला पाजत होते दूध आणि साखर,
….रावांना आवडते फ़क़्त जॉनी वॉकर.

पुन्हा आला सोमवार सुट्टीवर करून पुन्हा एकदा मात,
….रावांचे नाव घेऊन करू पुन्हा कामाला सुरुवात…

मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण,
….रावांचे नाव घेते या घराची मी आहे सुग्रण.

हिरव्या हिरव्या साडीला, भरजरी काठ,
….रावांच्या खोड्या सुरु, जरा वळली की पाठ.

बायकोपेक्षा बाकी पोरी, वाटतात गोड गोड,
….रावांना डोळे मारण्याची, फार जूनी खोड.

उखाणा घ्या म्हटलं की, उखाणा काही सुचत नाही
कोणाकोणाचं नाव घेऊ, माझंच मला कळत नाही.

चंदनी पानात मुग्ध कळी हसली,
….रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.

टीप टीप बरसा पानी पानी ने आग लगायी
….रावांशी लग्न करण्याची लागली आहे भलतीच घाई.

डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया,
….रावांना पहिल्यांदा बघताच झाला मला लवेरिया.

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
….चे नाव घेते राखते तुमचा मान.

धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
….च्या जीवावर करते मी मजा.

फाईव्ह प्लस फोर इज इक्वल टु नाइन
….. इज माइन.

गोव्याहून आणले काजू,
….थोबाडित द्यायला मी कशाला लाजु.

कपात कप बशीत बशी,
….माझी सोडुन बाकी सर्व म्हशी.

जीवन आहे एक अनमोल ठेवा,
….राव आणतात नेहमी सुकामेवा..

अंगणात पेरले पोतभर गहू,
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ.

खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका.
ती माझी मांजर आणि मी तीचा बोका..

सावन का महीना पवन करे सोर,
मतदान करु तरी कुणाला
इथे सगळेच उभे आहेत चोर!.

नाही नाही म्हणता झाल्या भरपुर चुका,
….चे नाव घेतो द्या सगळयाजणी एक एक मुका.

केळीचे पान टर टर फाटत..
….रावाच नाव घेताना कस कस वाटत.

काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत,
….राव गेले ऑफिसला मला नाही करमत.

एक बाटली दोन ग्लास,
माझी बायको फर्स्ट क्लास.

लग्नातील उखाणे

नीलवर्ण आकाशातून पडती पावसाची सरी
….चे नाव घेतो ….च्या घरी.

भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
….च्या जीवावर करते मी मजा.

नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व,
….आहे माझे जीवन सर्वस्व.

सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
….रावांचे नाव घेते पाच गडी राखून.

चांदीच्या ताटाला चन्दनाचा वेढा,
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा..

….रावांनी लग्नात उडवल्या हजारांच्या नोटा,
कारण त्यांचा बाप आहे मोठा….होऊ दे तोटा.

Facebook वर ओळख झाली Whatsapp वर प्रेम जुळले
….राव आहेत खरच बिनकामी हे लग्न झाल्या नंतरच कळले.

आघाडीत बिघाडी युतीत चाललये कुस्ती,
….रावांची कायमस्वरूपी माझ्या हृदयात आहे वस्ती.

आज आहे शनिवार उद्या येईल रविवार,
….रावांशी करते संसार, घडवू सुखाचा परिवार.

खोक्यात खोका टिवी चा खोका,
….माझी मांजर आणि मी तिचा बोका.

कौरव-पांडव यांच्यातील युध्दात
अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
…. राव माझे आहेत फार निस्वार्थी.

गोड करंजी सपक शेवाई,
होते समजूतदार म्हणून….करून घेतले जावई.

बागेत बाग राणीचा बाग,
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!.

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
..राव घरी परतले नाहीत अजुन,
कुठे पिऊन पडलेत की काय!.

रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,
..राव एवढे हँन्डसम पण डोक्यावर टक्कल..

बागेमध्ये असतात गुलाबांच्या कळ्या
..रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या..

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा,
लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…

लग्नात मागितला हुंडा एक खोक्का
..रावांचे नाव घेते .. कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का!.

आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा
….रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.

शनिवार-रविवार सुट्टी चा वीकेंड
….चे नाव घेते….आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.

श्रावणात पडतोय रोज पारीजातकांचा सडा,
….ना आवडतो गरम गरम बटाटेवडा..

चांदीच्या ताटात फणसाचे गरे
….राव दिसतात बरे पण वागतील तेव्हा खरे.

मराठी उखाणे नवरदेवासाठी

आंब्यात आंबा हापुस आंबा
अन आमची….म्हणजे जगदंबा.

निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
….रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.

मुंबई ते पुणे १५० कि.मी. आहे अंतर,
…. हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर.

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी ….
रावांचे नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी .

पाव शेर रवा पाव शेर खवा
….चे नाव घेते हजार रुपये ठेवा..

चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.

ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत,
….ला पाहून माझ डोक दुखत..

ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून भरला १०० रु दंड,
…. रावांना भरवते Ice cream चा घास सांगा आहे कि नाही थंड?.

स्टुलावर स्टूल बत्तिस स्टूल,
….राव एकदम ब्यूटिफुल.

पुढे जाते वासरू, मागून येते गाय,
….ला आवडते नेहमी दुधावारची साय.

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव,
….रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव!.

डाळित डाळ तुरीची डाळ
हिच्या मांडिवर खेळविन एका वर्षात बाळ.

….रांवाची थोरवी मी सांगत नाही,
कितीही प्याले रिचवले तरीही ते कधीही झिंगत नाहीत!.

सचिन च्या बॅटला करते नमस्कार वाकून,
….रांवाचे नाव घेते पाच गडी राखून!.

रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,
….राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल.

गार गार माठामधले पाणी ताजे ताजे,
….राव माझ्या मनाचे झाले राजे.

पावाबरोबर खाल्ले अमुल बटर,
….चे नाव घ्यायला कुठे अडलय माझ खेटर.

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे खुप मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ.

चांदिच्या परातीत केशराचे पेढे,
आमचे हे सोडुन बाकी सगळे वेडे..

नाही नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चूका,
….चे नाव घेतो, द्या सगळयाजणी एक एक मुका..

काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार,
….राव शिकलेले आणि मी अडाणी गवार.

इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात ना हो मून,
….रावांचं नाव घेते …. ची सून.

कॉलेज मध्ये असताना फिरवल्या कित्ती पोरी,
आणि शेवटी माझ्या नशिबी पडली गाव की ही गोरी.

विनोदी उखाणे

मातीच्या घराला, दरवाजे लाकडाचे,
….च नाव घेते, तोंड आठवून ….चे!.

टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
….चे नाव घेते , नवरा माझा SECOND HAND..

यशोमती मैया से बोले नंदलाला
….च नाव घेतो ,लाईफ झिंगालाला.

अख्ख्या महाराष्ट्रात असं गाव नाही,
जिथे माझ्या ….रावांचं नाव नाही !

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
….झाली आज माझी गृहमंत्री.

…. ला जाताना लागतो ….चा घाट,
अख्ख्या गावात नाही ….रावांसारखा थाट.

सावन का महीना पवन करे शोर,
मतदान करा ….रावांना, बाकी सगळे आहेत चोर !.

….रावांचे सुख हाच माझा अलंकार,
येत्या निवडणुकीत होवोत, सर्व स्वप्ने साकार.

एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल
जेंव्हा आहेत ….राव, मग कशाला हवा हमाल.

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर,
….रावांचे नाव घेते….रावांची लव्हर.

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
….माझी बायको आहे मोठी लुच्ची.

भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
….च्या जीवावर करते मी मजा.

हे हि वाचा : Marriage Anniversary Wishes in Marathi

मित्रांनो जर तुम्हाला हा Marathi Ukhane बेस्ट मराठी उखाण्यांचा संग्रह आवडला असेल तर जरूर शेअर करा व आम्हाला Twitter, Facebook, PinterestInstagram वर जरूर फॉलो करा.

Leave a Reply